news...:)
Written on 10:48 AM by Tushar
"सकाळ इंडिया फाउंडेशन'तर्फे १८ विद्यार्थ्यांना बिनव्याजी शिष्यवृत्ती
पुणे, ता. १६ - "सकाळ इंडिया फाउंडेशन'तर्फे उच्च शिक्षणासाठी यंदा १८ विद्यार्थ्यांना चाळीस हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. .......
या शिष्यवृत्तीचे मानकरी आणि त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे -
वृषसेन पुरुषोत्तम पवार (वय २९) - श्री. पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून "संगणकशास्त्र' विषयात "एमएस्सी' पदवी उत्तीर्ण झाले आहेत. याच विद्यापीठातून "संगणक व माहिती तंत्रज्ञान' या विषयात पीएच.डी. करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. कराटे व कबड्डीमध्ये त्यांनी बक्षिसे मिळविली आहेत.
जकी इम्तियाझ मुल्ला (वय २३) - श्री. मुल्ला यांनी पुणे विद्यापीठातून संगणक विषयात "बीई' पदवी मिळविली आहे. अमेरिकेतील "युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा' येथून "कॉम्प्युटर इंजिनिअरिंग' या विषयात "एमएस' करण्यासाठी प्रवेश व शिष्यवृत्ती मिळाली आहे. कविता करण्याचीही त्यांना विशेष आवड आहे.
निरंजन दीपक पेडणेकर (वय २४) - श्री. पेडणेकर यांनी पुणे विद्यापीठातून रसायन विषयात "बीई' केले आहे. अमेरिकेतील "ल्यूझियाना टेक्निकल युनिव्हर्सिटी'त "रसायनशास्त्र' विषयात "एमएस' करण्यासाठी प्रवेश आणि शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांनी क्रिकेट आणि फुटबॉल स्पर्धेत विशेष पारितोषिके पटकविली आहेत.
तुषार नंदकुमार ठोले (वय २३) - श्री. ठोले यांनी पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी विषयात "बीई' पदवी मिळविली आहे. या विषयात "एमएस' करण्यासाठी अमेरिकेतील "जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी'मध्ये प्रवेश व शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. व्हॉलीबॉल खेळात त्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केले आहे.
पुष्कर संतोष छाजेड (वय २२) - पुणे विद्यापीठातून श्री. छाजेड यांनी "बीई'ची (सिव्हिल) पदवी मिळविली आहे. अमेरिकेतील "जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मधून "एमएस' करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडकात त्यांनी भाग घेतला होता.
विपुल सुहास पदमन (वय २३) - श्री. पदमन यांनी पुणे विद्यापीठातून "बीई'ची (पॉलिमर) पदवी मिळविली आहे. अमेरिकेतील "युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न मेसिसीपी'मधून "पॉलिमर केमिस्ट्री' या विषयात "एमएस' करण्यासाठी शिष्यवृत्तीसह त्यांना प्रवेश मिळाला आहे. बॅडमिंटन आणि क्रिकेट हे त्यांचे आवडीचे खेळ आहेत.
मानसी नरेंद्र पिंगळे (वय २२) - मानसी पिंगळे पुणे विद्यापीठातून "बीकॉम' परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. फ्रान्समधील "ईएससी रेनीज स्कूल ऑफ बिझनेस' येथून "स्पोर्ट मॅनेजमेंट' या विषयातील उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रवेश व शिष्यवृत्ती मिळाली आहे. बास्केटबॉल आणि क्रिकेट या खेळांची त्यांना विशेष आवड आहे.
नेहा अजित अरोरा (वय २४) - नेहा अरोरा मध्य प्रदेशातील "इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, इंदुर' येथून "इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' या विषयात "बीई' उत्तीर्ण झाल्या आहेत. अमेरिकेतील "ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी'कडून "कॉम्प्युटर सायन्स'मधील उच्च शिक्षणासाठी प्रवेश व शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. नृत्य आणि चित्रकलेची त्यांना आवड आहे.
अमी प्रफुल्ल पारेख (वय २२) - अमी पारेख यांनी मुंबई विद्यापीठातून "कॉम्प्युटर इंजिनिअरिंग' या विषयातील पदवी मिळविली आहे. अमेरिकेतील "कॉर्नेल युनिव्हर्सिटी'तून "इंडस्ट्रियल अँड लेबर रिलेशन' या विषयातील उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. नाट्य आणि संगीत या कलांची त्यांना विशेष रुची आहे.
कल्याणी महादेव येळे (वय २२) - कल्याणी येळे यांनी पुणे विद्यापीठातून "भौतिकशास्त्र' विषयातील पदवी मिळविली आहे. नाशिक येथील "इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी' येथे पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
रश्मी चंद्रशेखर बोरोले (वय २२) - रश्मी बोरोले यांनी पुणे विद्यापीठातून "इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन' या विषयातील पदवी मिळविली आहे. अमेरिकेतील "मास्टर ऑफ फाईन आर्टस इन कॉम्प्युटर ऍनिमेशन' येथे उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांना चित्रकलेची विशेष आवड आहे.
दीप्ती मिलिंद केळकर (वय २१) - दीप्ती केळकर यांनी पुणे विद्यापीठातून "मायक्रोबायोलॉजी' या विषयात "बीएस्सी' पदवी मिळविली आहे. जर्मनीतील "युनिव्हर्सिटी ऑफ ब्रेमेन' या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळाला आहे. दोरीचा मल्लखांब आणि कराटेतही त्यांनी प्रावीण्य मिळविले आहे.
नीलिमा रमेश परांजपे (वय २३) - नीलिमा परांजपे यांनी पुणे विद्यापीठातून "इंडस्ट्रिअल सायकॉलॉजी' या विषयातील पदवी मिळविली आहे. अमेरिकेतील "इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मधून उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. गायन आणि चित्रकला या विषयातील परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.
स्वाती भालचंद्र वर्तक (वय २२) - स्वाती वर्तक यांनी पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयातील पदवी मिळविली आहे. कॅनडातील "युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरी'मधून पीएच.डी. करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. जपानी भाषेतील डिप्लोमाही त्यांनी मिळविला आहे.
वनश्री श्रीपती नरगुंद (वय २४) - वनश्री नरगुंद यांनी पुणे विद्यापीठातून एमएस्सी (प्राणिशास्त्र) आणि बीएड या पदव्या मिळविल्या आहेत. अमेरिकेतील "इंडियाना युनिव्हर्सिटी, ब्लुमिंग्टन' येथे उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांना वक्तृत्व आणि पोहण्याची आवड आहे.
अपूर्वा अभय राजगुरू (वय २२) - अपूर्वा राजगुरू यांनी संगणक अभियांत्रिकी विषयातील पदवी पुणे विद्यापीठातून मिळविली आहे. अमेरिकेतील "न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटी'मधून उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. "ह्यूमन मशिन इंटरफेस'विषयी आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
सजल विजय रायकर (वय २४) - सजल रायकर यांनी पुणे विद्यापीठातून "बीई' पदवी मिळविली आहे. अमेरिकेतील "युनिव्हर्सिटी ऑफ ऍकरॉन' येथून "बायोमेडिकल इंजिनिअरिंग' या विषयातील उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. चित्रकलेची त्यांना विशेष आवड आहे.
नाजनीन नौशीर इरानी (वय २१) - नाजनीन इरानी यांनी मुंबई विद्यापीठातून "इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' विषयात "बीई' पदवी मिळविली आहे. अमेरिकेतील "पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी'मधून उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. टेबल टेनिस खेळातही त्यांनी प्रावीण्य मिळविले आहे.